लोकशाही

 

लोकांना खोटं पण गोड बोलणारा हवा असतो,
आणि
खरं पण परखड बोलणारा नको असतो.


 

लोकशाही


आज एक सुंदर वाक्य 

माझ्या वाचनात आलं,

आणि वाचताच ते मला

मनापासून पटून गेलं.


किती समयोचित सुचतं 

काहींना हे असं लिहिणं,

ती चं जाणं, त्यांचं बोलणं, 

मग घुमजाव अन ती चं राहणं. 


खरंच, का नाही त्यांना रुचलं 

त्यांचं खरं बोलणं,

वरचढ मेजॉरिटीचं खोट्या

पुन्हा लोटांगण घालणं.


तूच कर्ता अन करविता,

आमची तूच तारणहार,

खऱ्या खोट्याच्या वादात

लोकशाहीची होत नाही हार?


असतो सारा मामला हा 

त्यांचा त्यांचा अंतर्गत 

सवाल करता येते कसे

उत्तर पटकन मुखोद्गत.


ज्येष्ठांना देता कुणी

आराम जरी असेल थोडा,

का सारती त्यांना बाजूला?

असा दामटती हेच घोडा.


ज्यांच्या जीवावर लढून

आंदोलने बक्कळ झाली,

खुर्चीत बसताच कशी यादी

तीसुध्दा का मागे पडली.


एकामागून एक सोबती

गळून सारे जेव्हा पडले,

बघताबघता थोरामोठ्याना

साईडला की हो त्यांनी केले.


खुर्ची पुन्हा मिळाली तरी

आठवण काही नाही झाली,

बातमी लोक पालण्याची

स्मृतीभ्रंशात विरून गेली.


तुलना यत्र तत्र सर्वत्र 

अजुनी अशी सुरूच होती,

कुणाचं काम, कुणाची वाक्ये,

सोयीसोयीने पुरुन उरत होती.


खऱ्या खोट्याची दुनिया

ही अशीच सुरू राहणार,

हीच तर खरी ओळख तिची,

लोकशाही टिकून राहणार.

लोकशाही टिकून राहणार.

-

प्रविण

२४/०८/२०२०

Comments

  1. लोकशाही
    प्रवीण जी तुम्ही खरच खूप सुंदर कविता लिहिली आहे.
    सद्य वस्तुस्थिती ची आठवण प्रकर्षाने आली

    ReplyDelete

Post a Comment