उधळली निळाई, मोत्यांची पखरणी

 

Sawantwadi moti talav beautiful lake - YouTube


उधळली निळाई आसमंती कुणी,
मोत्यांची पीत धवल तीत पखरणी,

आतुर होई बरसण्या वर्षा अंबरी,
मेघातूनी धाव घेई उतरे धरतीवरी,

मिलन हे दोघांचे की असे जाहले,
निळाईचे रूप परस्परा निखरले,

भिन्न गुण भिन्न रूपे धरती अंबरा,
नीलकृष्ण एकरूप, करितो सत्वरा.


Sawantwadi Photography, Photography Spots in Sawantwadi | Pixean

Comments