
होशील ना रे तू !
रुसेन जराशी मी कधीही,
समजावशील ना रे तू ।
जाईन जर का दूर कधीही,
कुशी तुझिया घेशील ना रे तू ।
बसेन टाकुनी जर बोलणे
मौनास तू मम उलगडावे,
साद घातली जर कधी मी
प्रतिसाद त्या देशील ना रे तूू ।
ढळता तोल रागे मनीचा
द्यावा हात तू सावरावे,
गैरसमजी माझ्या खुळीच्या
माफी हृदयी देशील ना रे तू ।
उदासी मज घेरते एकांती
पुकारूनी नाव तू जागवावे,
वाटे दूर जेव्हा निघूनी जावे
बाहुपाशी तेव्हा घेशील ना रे तू ।
विसरण्याचे पाप घडता
गीतातुनी त्वरेने आठवावे,
येता यमधर्माचे ते बोलावणे
सत्यवान माझा होशील ना रे तू ।
Comments
Post a Comment