भ्रुणहत्या

 

Gujarat most female foeticides 2017 | गुजरात में सबसे ...


भ्रुणहत्या


अरेरे! शब्द मुखी या, हे बघताच आला होता,
वाचन करता नयनी, हुंदका गळाला होता.
 
दाखवी मनच्या भावनातो कविताच झाला होता,
अहं माझा तव स्त्रीत्वावाचता जळाला होता.
 
व्यथा सावित्री साऱ्याशब्द व्यर्थच झाला होता,
सत्यवान पुरुषा मधलामागुती पळाला होता.
 
आदर्श परस्त्रीमाताआज पुराना झाला होता,
सीतेचे शील हरण्याजटायू चळाला होता.
 
जन्म माझिया पोटीया विश्वाचा झाला होता,
चारा फाडण्या उदराहा काळ गळाला होता.

------ ------- ------- -----
*चारा - मासे पकडण्यासाठी लावतात तो
*गळ - ‌मासे पकडण्यासाठी वापरतात तो

Comments