चर्चा तर होवकच व्हयी

चर्चा तर होवकच व्हयी


या आभासी दुनियेच्या बाहुपाशात,  

वा भेटलो कधी कुणाच्या लग्नाबारशात

सत्कारणी वेळ आपलो घालवण्यासाठी,  

चर्चा तर होवकच व्हयी ।।

 

राजकारण अर्थ वा समाजकारण

विषय मांडू मोकळेपणानं उठवया रण

तावातावानं एकदा भांडण्यासाठी

चर्चा तर होवकच व्हयी ।।

 

कवीचा थोरपण खंयच्या लेखाचा परीक्षण

कुणासाठी गरजेचा प्राण्याचा रक्षण

बाजू आपली दमदार मांडण्यासाठी

चर्चा तर होवकच व्हयी ।।

 

पोपटीची रेसिपी की तळलेली मासळी

घावन धोंडास की पुरणाची पोळी

जिभेची खाज अशी भागवण्यासाठी

चर्चा तर होवकच व्हयी ।।

 

दीक्षितांचा आहारशास्त्र की दिवेकरी गणित

शाकाहारी मांसाहारी प्रत्येकाची रीत

जीवशास्त्रातला गणित सोडवण्यासाठी

चर्चा तर होवकच व्हयी ।।

 

श्रद्धा की श्राद्ध, कोणाचो झाडू नि कावळो

पंगतीतल्या अळवा-खीरीर सगळ्यांचो डोळो

सगळा पुढले पिढयेक ह्या पोचवण्यासाठी,  

चर्चा तर होवकच व्हयी ।।

 

औषधांचे बरेवायट साईड इफेक्ट्स

बरबटलेल्या यवस्थेचे पेशल इफेक्ट्स

नागव्या करून तेंचि भादरण्यासाठी

चर्चा तर होवकच व्हयी ।।

 

गझलनवाज कोण आसता दशावतारी,  

लेखणी कोणाची चलता कोटलवारी

तनामनाची कला पुढे जपण्यासाठी

चर्चा तर होवकच व्हयी ।।

 

अज्ञानी म्हणान कोणी ज्ञान जमयता

म्हणी नि गाळये कोण मालवणी शिकयता 

ठेवो मागले पिढयेचो वाढवण्यासाठी

चर्चा तर होवकच व्हयी ।।

 

एकेठय कधीमधी जमली चार टकली,  

सरांनत इषय जेवा चालू रवता टकळी

रातभर तेवा गजाली पेटवण्यासाठी,  

च्यार च्या तर होवकच व्हयी ।।

 

- प्रविण धुरी


Comments