आठवणी
विसरू म्हणती अशा तुझ्या
गोष्टी असती मनी कितीतरी,
आठवाव्या तर एक नाही
उसळती मग उधाणापरी.
कधी कोठे घडे भेट आपुली
ऋतू पावसाळी गर्द धुक्यातुनी,
धुंद कुंद चिंब भिजवुनी,
आठवती क्षण ते दवापरी.
हात सुटता मग साथ सुटली
हरवलो आपुल्या वनातुनी,
मिलनाची ओढ अजुनी
शोधित फिरते चुंबकापरी.
घडावी भेट पुन्हा फिरुनी
फुटे पान्हा इच्छेला मनी,
जीव गुंतला या पळातुनी
धाव धाव रे सख्या सत्वरी.

Comments
Post a Comment