भरले ग आकाश, भरले ग डोळे
हिरवा नरेंद्र मागे ढग काळे काळे
उजळती दीपमाळा उजळले तळे
भरू आले आकाश भरले ग डोळे
सय माहेराची कसे अडवू या जळे
हवा कशी कुंद आसमंत हा धुंद
वाऱ्यासंगे येती बघ छोटे छोटे बुंद
शमवी तहान आता बरस रे बेधुंद
वाट बघुनि दमली धरतीची बाळे
मेघ जमले आषाढाचे
मन झाले दमयंतीचे,
साद घालिते कालिदासा
दूत धाडण्या या रतीचे,
व्याकुळ हे तनमन माझे
सांज येता भय रातीचे,
नळराज रुसला असा
मदन काया उभी जाळे.

Comments
Post a Comment