चंदेरी किनार

 



ऐकून होतो असते चंदेरी किनार,
नभी काळ्या त्या मेघांना जलभार,
बदलले रूप, बदलला मौसम
रंगानीही बदलली अपुली सरगम,
 
काळ्या जलदावरी नारिंगी दुपट्टा
पिवळा त्यात उमटे छोटासा पट्टा
दुःखानीही आता थोडे बदलावे
रंगीत स्वप्नापरी थोडे सतरंगी व्हावे.
 
प्रविण १०/०६/२०२०


Comments