वाहतुकीचे नवे नियम

know why traffic police do their operation by hiding behind tress ...

 

वाहतुकीचे नवे नियम

 

वाहतुकीच्या नव्या नियमांना आणि त्यावरील वाढलेल्या दंड आकारणी विरोधात, काही हुशार लोकांनी दिलेल्या सूचना सरकारने लगोलग अमलात आणायचं ठरवलं, कारण नियम पाळण्याच्या सक्तीपेक्षा हे सोपे बदल लोकांना आपलेसे वाटत होते.

 त्यामुळे दिसणार चित्र काही अंशी असं होतं...

 

मुंबईत बहुतेक सिग्नलवर दोन्ही बाजूला, भली मोठी रांग होती, रस्त्याच्या बाजूला काही विशेष दुकानं थाटण्यात आली होती. गर्दी होती,

पण नवीन रोजगार निर्माण झाल्याने जनता खुष होती.

आता RTO किंवा पोलिस ऑफिसर सिग्नलमागे उभे राहून दंड आकारत नव्हतेतर सिग्नलवर पावती बनवून हेल्मेट विकत होते,

कुणी नियम पाळतोय की नाही यापेक्षा त्यांना आपल्या हेल्मेट विक्रीच्या मंथली टार्गेटची चिंता होती.

puc irda: Don't give insurance without PUC, IRDA told | India News ...

 

दुसरीकडे काही इन्शुरन्स कंपनीची माणसं गाड्या रस्त्याच्या बाजूला उभ्या करून तिची पॉलिसी करत होते, त्यामुळे अनेक एजंटना रोजगार मिळून कंपन्यांचा बिझनेस वाढला होता.

 

RTO तर इतके खुष होते की विचारू नका,,,

इतकी वर्षे त्या कळकट ऑफिसात फाईलींच्या मध्ये काम करणारी लोकं आता ओपन एअर ऑफिसमध्ये काम करत होते,

मागेल त्याला लायसन्सगाडी चालवतो म्हणजे लायसन्स द्यावेच लागणार,

किती सोपं ! 

उगाच त्या टेस्ट नको, ती परीक्षा नको ,,, काही नको.

किती सोपं झालं होतं आयुष्य आता!

 

त्यासाठी थोडी झळ सोसायला काय हरकत होती?  

सिग्नलवरचं चौकाचौकातला थोडासा ट्रॅफिक जाम झाला तर झालाएंक्सिडेंट तर कमी झाले होते,

गाड्यांची आणि हेल्मेटची विक्री तर वाढली होती,  

लोकांसमोरच लायसन्स मिळत असल्याने भ्रष्टाचार कमी होऊन पारदर्शकता तर आली होती,

 

सीट बेल्ट न लावणाऱ्याना गाड्या थांबवून सीट बेल्ट लावण्याचं कंत्राट मिळाल्याने कुणी नगरसेवक खुष होते,  

दारू पिऊन गाडी चालवणारे ड्रायव्हर आता स्वतःहुन गाडी थांबवून, तिथल्या स्टॉलवर आपल्या पसंतीचे काळी कॉफी किंवा लिंबू सरबत मागून घेत होते.

 Which are the famous tea stalls in Bhilai? - Quora Coffee: Benefits, nutrition, and risks

आता यातही काही नतद्रष्ट लोकांना वाईट बाजू दिसते, त्याला पर्याय नाही, अशा लोकांचं आपण काही करू शकत नाही,

काहीजण आरोप करत होते की, काहीजणांच्या घरात आठ दहा हेल्मेट जमा झाली होती, तर काही लोकांकडे पाच पाच पियुसी, अकरा लायसन्स, सोळा पॉलिसी जमा झाल्या होत्या.

 

ही खरंतर चांगली गोष्ट होती, एवढा सेल होत होता, टार्गेट अचिव्ह होत होतं,

गव्हर्नमेंटला पैसे मिळत होते,

रोजगार निर्मिती होत होती,

अर्थव्यवस्थेला चालना मिळून देश मंदीतून बाहेर आला होता.

 

सर्वत्र कसा आनंदी आनंद होता,

मोठमोठाले दंड नाहीत अन वर इतके सगळे फायदे,

आधीच का नाही सुचलं हे कुणाला?

 


Comments