अव्यक्त प्रेम



अव्यक्त प्रेम 


बेचैनी थकवा उदासी
सारी लक्षणे जरासी,
सांग का येती अशी
सय येता तिच्या संगती. 


सोडता कुंतल मोकळे
वाटे आकाश भरे काळे,
दुवा गावाची तुज मिळे
नजर नभी भिरभिरती.  

मृगाच्या नाभी कस्तुरी
तुझे प्रेम माझिया वरी,
नसे दिसले कधीही जरी,
सुगंधाने मज भारिती.


Comments