![]()

शस्त्रपूजा
कुणासाठी शस्त्र
असते तलवार,
कुणा तो भाला
बरची हत्यार,
कुणाचे करवत
हातोडा रंधा
तराजू सांभाळे, करे कुणी धंदा,
कुदळ फावडे पारय
घमेले,
नांगर सजवे कुणा
शेताचे मळे,
पेन्सिल ब्रश
म्हणे शस्त्र चित्रकार
लेखका दुधारी
पेनच तलवार
माईक स्पीकर नि
ऍम्प्लिफायर,
कुठे बंब विझवती
पेटती फायर,
ट्रक बस रिक्षा, टॅक्सी वा ट्रॅक्टर
वाहन कुणाचे
कमाईचे फॅक्टर,
कुणा दारी त्याची
सजते सायकल
पूजा होते जेव्हा
येते रफायल,
स्कुटर वा मोटार
पूजा बिनघोर
साजरे करिती सारे
परंपरा थोर,
ज्याच्या
त्याच्या ह्या श्रीमंत प्रथा
आयुधं त्याने बघा
मानी पूजल्या,
कृतार्थतेची मनी
भरली भावना,
पुजुनी कर्तव्या
चालती राणा.
-
प्रविण धुरी (११/१०/२०१९)

Comments
Post a Comment