सगळं सुरू आहे !

 

On Day 8 of lockdown, traffic jam in Chennai, crowded market in ...

सगळं सुरू आहे!

 

फुल, नारळ, मेणबत्ती, चादर
विश्वास श्रध्दा दारोदार सुरू आहे,
माझं मलाच हसू आलं बघून
मेळा भरवून इथे बाजार सुरू आहे.
 
हे बंद, ते बंद, सगळीकडे बंद
वाटते जिंदगी जागी थिजली आहे,
थोडा विचार करता आले कळून
जिथे तिथे मृत्यूचा व्यापार सुरू आहे.
 
भयभीत, कंपित स्वत:पासून लोक
विचाराने सुध्दा थरथरतात लोक,
हाती उपाय असूनसुध्दा, बावचळून
मास्कमागून शिव्यांचा भडिमार सुरू आहे.
 
मीठपीठ चीज बटर अन बिस्किटे
दुनियाभरचा बाजार किचनमध्ये आहे,
राहण्या जिवंत गरजाची मिळून
घरभर अनावश्यक भरमार सुरू आहे.
 
कोणाचं खरं, कोण बोलतं खोटं
प्रत्येकाचा निराळा अंदाज इथला आहे,
अर्थ, आरोग्य, शिक्षण सगळं गाळून
अनागोंदीच्या कारभाराचा अंधार सुरू आहे.


Mumbai converts iconic places into quarantine centres as COVID-19 ...

Comments