

पुलवामानंतरची मैत्री
झाला हल्ला पुलवामात, लढाई झडते तुम्हांआम्हांत,
धारातीर्थी ते शौर्य पडले, येथे फक्त शब्दशर बरसतात.
वीरमरण ते घायाळ तो सैनिक, मैत्री जखमी मन दुरावतो,
वीरांच्या त्या बलिदानाचे, राजकारण का जो तो करतो.
निःशस्त्र तो वार झेलतो, भ्याडपणाचा शिकार होतो,
निःशब्द लंगोटीयारा करण्या, शब्दकट्यार ती मी वापरतो.
विसरुनी जाती धर्म आपुला, त्यांचे ते बलिदान आठवा,
आरोळ्या आवेशात दिधल्या, पायदळी पण संयम मेला.
काळे निशाण काळा बावटा, चार दिसाचा हा दुखवटा,
सैनिक लढतो देशासाठी, मरणात शोधे कुणी अपुला वाटा.
नवविवाहिता कुणी पोटुशी, सोडून मागे म्हातारी जाशी,
सीमेवरी जरी ते लढलो नाही, असे आता ही रोजची लढाई.
शब्दच करूनी अपुले गलबत, एकजुटीने साथ करू,
रसद पुरवुनी देऊ सोबत, नाव तयांची पार करू.

Comments
Post a Comment