
तुझ्यातल्या प्रतिभेसाठी
तुझ्यासाठी कवन रचावं, म्यां काय पामरानं,
शब्दघन बरसून यावं, भिजवून जावं शब्दरान,
शब्दांसी तू खेळतसें, शब्दच तुझे अवधान
शब्दरव करीत येती, रुणझुणती शब्दपैंजण,
शब्दवाटिके तव शब्दसुमने, शब्दसुवासे मी शब्दभ्रमर
कवयित्री तव विशेष दिनी, तुजसाठी रचिले हे शब्दथर.
तुझ्या निमित्ते माझे हे, शब्दासव खेळणे,
शब्द शब्द जोडुनी, केशी तव माळणे.
कोण थोर कोण सान, सारे कसे हो समान
तरीही किमया करी, शब्दांचे कुरवाळणे.
....सुप्रभा, हे तुझ्यातल्या प्रतिभेसाठी
Comments
Post a Comment