शाळासोबत्यांचे पुनर्मिलन

 Class of 1974 Hildebran High School Reunion Is Nov. 9 | Focus ...


शाळासोबत्यांचे पुनर्मिलन

एकदा भेटून झाल्यावर,  पुन्हा एकदा जमतील सारे?
तुमच्या येण्याने तरी वर्ग, पुन्हा एकदा भरतील कारे?
तशा भेटीगाठी छोट्या,  होती रोजच्या इथे पण
मिळुनी फड आठवणींचे,  पुन्हा एकदा जमतील कारे?
सवे रमलो बालवयी जिथे,  शाळेच्या त्या पटांगणी 
मातीतुनी साद ओळखीचे,  पुन्हा एकदा बोलतील कारे?
धडपडलो एकटेच नंतर,  जगलो आयुष्य इथले
दोन मैत्रीची सांग आसवे,  पुन्हा एकदा गळतील कारे?
अर्ध्यावर काही सुटले,  काही इथवर मार्ग चालले
संग साथी गतप्रवासाचे,  पुन्हा एकदा चालतील कारे?

...चला पुन्हा भेटुया !

Comments