मी आणि तू

रुसलो मी अन् रुसलीस तू
समजूत कुणी काढायची?
गप्प मी अन् तिथे मौनात तू
अबोला कुणी सोडायचा?
दुःखी मी, मोठ्या कष्टात तू
पुढे हात कुणी करायचा?
नाराज मी कधी नाराज तू
माफ पहिले कुणी करायचे?
दोघे 'मी' सहजी जिंकू दिला
मीपणाला या कुणी हरवायचे?
श्वास क्षणीक सुखाचे असती इथे
एकट्याने मागे कुणी रहायचे?
कायमचे जर मिटता नैन एकाने
पश्चातापाने कुणी जळायचे?

Comments