मी आणि माझी परी

 



मी आणि माझी परी

बसलो होतो निवांत घरी,


बाहेर कोरोनाचा कहर

बंद केलं होतं सारं शहर,


वेळ एकमेकां देण्यासाठी

हीच संधी होती गाठी,


म्हणाली बाबा किती तू साधा

करत नाहीस कसलीच अदा,


चल मी तुला थोडी सजवते

आज तुला चांगली नटवते,


हाती घेऊन बसली कंगवा

नाही केला काही मीही कांगावा,


विंचरले केस, बो बांधले दोन

सांगा बघू बाबा दिसती कोण,


परीराणीची आता खुलली कळी

छोटूल्या बाबाच्या पडली गळी.

 

घरीच थांबा, सुरक्षित रहा, परीसवे तुमच्या आनंदी व्हा.


Comments