अवतार

 

Maharashtra floods: Navy, NDRF rescue teams pressed into action in ...

अवतार


नाशकातल असो तांडव की मुंबईतला पूर,

कोकणचा हाहाकार की बुडालेलं कोल्हापूर,

धावला तिथे माणूस फुंकर घाली दुःखावर,

का शोधीशी देव वेगळा, माणसातच ज्याचा वावर,

 

विनायक कुणी आला,  नावेचा आधार देऊन गेला,

अल्लाचा बंदा येऊन कुणी पाणी पाजून गेला,

लक्ष्मीमाय कुठुनशी अन्नपूर्णा होऊन आली,

ज्योतिबा उबेची मायेची घोंगडी पांघरूण गेला,

 

देव असतो माणसातच,  संत सांगून गेले,

माणुसकीच पूजा त्याची बंध दावून गेले,

श्रद्धा अंधश्रद्धेच्या हिंदोळ्यावर नका डोलत राहू,

माणूस हाच अवतार आहे,  नका शोधत राहू,

 

भगवा हिरवा निळा लाल,  झेंडा आवडीचा हाती घ्या,

त्याचा कपडा गरजू झाकायला, बुडत्या आधार काठीचा द्या.


photo image- ET


Comments