सावली
मृदू हळवी वाटे कधी, कणखर भासे प्रसंगी,
जीवनाच्या वाटेवरी, शांत संयमी ती व्यासंगी.
गुलाब काटे जे जे पदरी, स्विकारीत जाई तव हासू,
संभ्रमित बघुनी नियती, स्मित ओठी नयनी आसू.
जपते हृदयी चैतन्या अन, तमन्ना ती एक मनी,
भविष्य घडावे दोघींचे हा, ध्यास सदा ध्यानीमनी.
बनुनी त्यांची सावली, तू वर्तमानही सावरते,
देवूनी छाया लेकरां, तू झळा कठीण त्या अडवते.
भाग्यवान आम्हां म्हणोनि, मैत्र तुझे लाभले,
साथ सदा सोबतीचा तुझिया, वचन तुला हे आपले.
Comments
Post a Comment