केविन केविलवाणा


These Haunting Kevin Carter Photos Help Explain His SuicideKevin Carter - Wikipedia


केविन केविलवाणा

 

जपला मी छंद माझा, टिपूनी छबी त्या बालका

तोडिती लचके गिधाडे, बनुनी सांगा काल का?

 

पूर पाणी शुष्क जमिनी, मी कर्मधर्म मज पाळला

हरवली मग माणुसकी का, उत्तर कुणी हे द्याल का?

 

अवकृपा सारी दोघांवरी जरी, लेकरे असती तुज प्यारी

मिळे घास कुणा पिल्ला परी, गमवि कुणी मां बाळ का?

 

गोध्रेमधल्या तसबरीतुनी, दिसते पाणी गहिऱ्या नयनी

सार्थक मज पुरस्कार अन, सारे पालक त्या व्हाल का?

 

गत मजबुरी लोंढे सागरी, कोमेजले बाल्य शव ते किनारी

बंद करोनी युद्धे भूवरीबंद झाल्या सीमा उघडाल का?

 

पुरस्कृत मी गौरवी कार्ये, पिशाच्चे मनीं परी भिववी काये

दमलो थकलो, हा चरणी देहे,  मोक्ष मम जि  द्याल का ?

© प्रविण धुरी. 

 

Qutubuddin Ansari, The Face Of 2002 Gujarat Riots Wants Political ...Dead Syrian child washed up on a Turkish beach - Imgur

Comments