वाट
वाट ... चिंब भिजलेली
वाट ... चिंब भिजयणारी
वाट ... तेच्या घराकडे जाणारी
वाट ... म्हणान जगुक बळ देणारी
वाट ... गोल मोठ्या डोळ्यात
वाट ... खोल खोल डोहात
वाट ... ठहरणारी नि हरवणारी
वाट ... कधी काही आठवणारी
वाट ... खूप काही साठवणारी
वाट ... दिसता दार थांबणारी
वाट ... हळूच आत उतरणारी
वाट ... थांग तिचो शोधणारी
वाट ... नजरेपल्याड भिरभिरणारी
वाट ... लीवक भाग पाडणारी
वाट ... तुझी तीच माझी म्हणान
वाट ... बघीन सारखी वाटणारी.
Comments
Post a Comment