Skip to main content
संजूदादा
नाय नाय कितक्या म्हटला गातात तरी गीत,
सांगा कशी आडयी येता परत परत रीत,
आवड नाय म्हटला तरी घालतात सगळे गोंधळ,
हातपाय जोडून सांगा होतंय नको घालू गळ,
एकटो गाठून आजच्या दिसा एकीचा दाखयलात बळ,
आणि वरते सांगतात माका अशीच आसता रीत,
चाकलेटा वाटा, खावक घाला घेवन माझा नाव,
गरीबाच्या पोटाक लागने वायच देवा माका पाव,
ताच समाधान ताच सुख देण्यात असता भाव,
देवाक जवळची सगळ्यात असता हीच एक रीत,
लुंगेतल्या अन्नासोबत चायचो घोट घेवनी,
सोपलो शिरावन, उपास सुटलो, तुकडो ताटात
येवनी,
आजचो दिस माका वायच पॉटभर खावनी,
काढतंय सेल्फी नि आठवणी मेसेज तुमचे वाचीत,
चाळेगत केसपिक्याची बेगीन जागी झाली,
कट केल्यासारखी कशी ठरवन छळूक माका लागली
इज्या संज्या बाबा कोनाक सीमा नाय उरली,
इशेषणा लावन लावन माझा केल्यानी भरीत,
ह्यो एकच दिस वर्षातलो आसता 'ती'च्यासाठी,
गजाल आमची ह्या दिसा पुढली पायरी गाठी,
अरे सोडा वायच लांब रवा येता जवळ साठी,
पुरी करुनी आता तरी येष्टीतली आमची प्रीत,
बघा कशी आडयी येता परत परत तुमची रीत.
३० ऑगस्ट २०१९
Comments
Post a Comment