तुला जमणार नाही

Opinion News - अकेला ही भला | Patrika News


 
व्यथा मनच्या सांगी वृथा मी
तुला हृदयी त्या छळणार नाही,
 
मौनासवे गुज माझ्या करी मी
तुला कानी ते ऐकू जाणार नाही,
 
कोठे जायचे ते तू का पुसावे
तुला चालणे सवे जमणार नाही,
 
राहू दे एकटे मला एकांती
तुला विरहगीत हे कळणार नाही,
 
नको रडणे ऐकवू कुणाला
तुला अश्रू नेत्री भिजणार नाही,
 
तुटला आकाशीचा एक तारा
तुला मज मागणे जमणार नाही,
 
डोळ्यातुनी का शोधिसी कहाणी
तुला स्वप्ने तशी दिसणार नाही,
 
कुडीतुनी निघती प्राण माझे
तुला रोखणे असे जमणार नाही.
-
©प्रविण
१२/०७/२०२०

Comments