Skip to main content
नको म्हणती राजकारण, अर्थ वा समाजकारण,
बोटं काही चालत नाहीत, कोणतंही द्या दुसरं कारण,
उच्चारता शब्द गेट टूगेदर पुर्वी म्हणत चल
वाट धर,
विषय दिला थोडा हटके म्हटलं थोडा
विचार कर,
फेसबुक, नि व्हाट्सअप्प असतो दिनरात ऑनलाईन,
डेटा बीटा होताच स्वस्त केलं हिलाच
लाईफलाईन,
थोडी म्हटलं बंधनं घालू वेळेची जरा
मर्यादा ठेवू,
दिवसातले फक्त दहा तास बाकी वेळ निवांत
राहू,
कल्पना केली काय होईल वाटलं जरा गंमत
येईल,
कुणी काय कुणाचं काय नव्या
मुद्द्यांना जाग येईल,
पुरी होईल कुणाची झोप कुणा वाट्या
अर्धांग कोप,
मुलं करतील अभ्यास खूप, कुणा मिळे xxxxx वर चोप,
बोटांपेक्षा जास्त जीभ
चालेल, मैफिल रोज रोज सजू लागेल,
शुभेच्छा, श्रद्धांजली देताना माणसाला किंमत मिळू लागेल,
पती, पत्नी, बॉस, ऑफिस मिळतील बहाणे
तुम्हा छत्तीस,
मेंदूला ताण थोडा देऊन
बघा विषय चघळा हा एक
दिस,
शिव्या कितीही घातल्या
तरी राजकारणा शिवाय
बोलत नाही,
फॉरवर्ड फॉरवर्ड खेळताना नवे काही आम्हां
चालत नाही.
Comments
Post a Comment