मला उमजलेला शिव

 




मला उमजलेला शिव

 
महादेव, शिव, शंकर, अशा कितीतरी नावाने ओळखलं जाणारं हे एक व्यक्तीमत्व. 
हो... व्यक्तीमत्वचं... वाढलेल्या जटा, अंगावर वल्कले आणि भस्म, गळ्यात साप, हातात त्रिशुल आणि सदा तापट स्वभाव... हे म्हणजे आपल्या इतर देवत्व लाभलेल्या व्यक्तीमत्वांपेक्षा अगदी विरोधी टोकाचं वर्णन. म्हणुनच मला या व्यक्तीमत्वाचा पुन्हा विचार करावासा वाटला आणि माझ्या नजरेला जे दिसलं ते काहीतरी वेगळंच होतं. कोणाला पटो अथवा न पटो, पण मला उमजलेल्या शिवाचे रुप आणि स्वरुप थोडेसे भिन्न निघाले, त्यातुन एक अर्थ सापडला.
 
कसा असतो हा शिव? काय काय असतं बरं त्याच्याकडे आणि ते आपल्याला काय सांगतं ? 
 
 
Nag raj | Lord shiva hd wallpaper, Shiva angry, Lord shiva
१. साप - कात टाका.
- कितीही त्रास झाला तरीही, ज्याला चिकटून आहात ते जुनं (कात) टाकून नवीन (त्वचा) धारण करा. 
ते नवीन सुद्धा आतूनच उपजणार, ते अडवू नका, बाहेर येऊ द्या. बाहेरचं आवरण आता जुनं झालं ते गळून पडू द्या.
त्या नाविन्यात प्रगती आहे.
जुन्या विचार आचारांचं आवरण कितीही घट्ट असेल, ते काढताना आतील शरिरावर ओरखडे उठत असतील, रक्त येत असेल तरीही, 
 
पुढे जाण्यासाठी, प्रगती साधण्यासाठी आणि या निसर्गात टिकुन राहण्यासाठी ती कात टाकणं आवश्यकच.
 
 
२. राख - राखून ठेव/ विरक्ती.
- राख म्हणजे विरक्ती. 
जे मिळवाल ते राखुन ठेवा, जे कमवाल ते राखुन ठेवा, पण अती करु नका, कारण जीवनात सारं काही उपभोगून शेवटी हाती काही उरणार नाही याची जाणीव असू द्यात. आणि म्हणुन भौतिक सुखाच्या मागे धावु नका. अंती सर्व काही राखेतच बदलणार आहे. 

अंगी वेळीच विरक्ती आणा. तेच सर्वव्यापी सत्य आहे. 
 
 आज शाम पौष शुक्ल द्वितीया के अवसर पर ... 
३. भाळीचा चंद्र - शीतलता, सौम्यता.
- अंगी नम्रता बाणवा
कुणीतरी एक शक्ती (सूर्य) आहे, जिच्या प्रकाशकृपेमुळे मी आहे, आणि मी नेहमीच तिचा ऋणी आहे, ही नम्रता.
 
आयुष्याच्या प्रवासात येणारा प्रकाश (आनंद) अन अंधार (अडचणी) ही त्याचीच (सूर्य) किमया. 
तो भ्रमणा करताना भासला तरी एका जागी स्थिर आहे, आणि आपण आपला जीवनप्रवास त्या शक्तीवर विसंबून निरंतर सुरु ठेवावा. 
 
Shiva's damaru | Shiva, Mahakal shiva, Shiva sketch
४. डमरू - संयम
- शिवाचा डमरु हा भयकंप उडवायची शक्ती असणारा. कितीही मोठा आवाज करण्याची अदभुत शक्ती असतानाही, ती कधी आणि किती वापरावी याचा संयम असावा हे सांगणारं प्रतिक.
कोणत्याही शक्तीला स्वतः काही करता येत नाही, जोवर त्या पाठीमागचा कर्ता हात काही करत नाही. जर हाताने योग्य वेळी हालचाल केली तर अशी विध्वंसक शक्तीसुध्दा सुश्राव्य सुमधुर संगीत निर्माण करू शकते. पण त्यासाठी संयम आवश्यक.
 

Maha Shivratri Lord Shiva Trishul Illustration Background Royalty ...
५. त्रिशूल - शस्त्र आणि त्यामागचं शास्त्र.
- फेकलेल शस्त्र, मग ते कोणतंही असो, ते घायाळ करणारच, अगदी शब्दसुद्धा.

त्या त्रिशूलाची तीन टोके असलेली बाजू आकाराने लहान असली तरी लगेच रक्तबंबाळ करणार. 
पण, त्यामागचा लांबलचक दांडा मात्र आपल्याला ते शस्त्र फेकण्यापूर्वी अनेक संधी देतो, 
विचार करण्याच्या, थांबण्याच्या, संबंध जपण्याच्या, नातं वाचवण्याच्या. 
शब्दांचंही तसंच असतं, ते कधीही कुणालाही जख्मी करु शकतात, रक्तबंबाळ करु शकतात. पण जर आपण वेळीच आपली जीभ आवरली तर नाती, संबंध वाचु शकतात.
 
६. नीलकंठ (नीळा देह)
- अथांग, अविरत, खोल.
जेवढी विचारांची खोली जास्त, तेवढे आपण जास्त शांत, 
आणि जितके आपण शांत, तितक्या शक्यता अथांग.

इतरांच्या वागण्या बोलण्यातुन विचलीत होवु नका, शांत रहा. चिडुन लगेच डमरु वाजवायला लागल्यावर पुढच्या शक्यता धुसर होतात, दिसत नाहीत आणि मग नुकसान होण्याची शक्यता वाढते. 
त्यापेक्षा निळ्या आभाळासारखे, निळ्या सागरासारखे शांत रहा, गर्भात किती गुपित आहेत, किती अगणित शक्यता आहेत हे इतरांना कळु देवु नका. 
 
७. गंगा- प्रवाही अन सर्वसमावेशक.
- पाण्यासारखं प्रवाही असावं आणि सर्व काही सामावून घेणार असावं, जो नवा रंग, जो नवा स्वभाव, नवा गुण वाटेत येईल तो सामावून घेत प्रवाही रहावं. पण शेवटाकडे येतायेता सगळा गाळ वेगळा करत. 
आपली शुद्ध निर्मळता मात्र जपावी आणि पुन्हा या विश्वाच्या अथांगतेत सामावून जावं,,, पाण्यासारखं.

Shambhu--Har har mahadev | Lord shiva, Shiva, Shiva lord wallpapers


तर असा हा मला उमजलेला शिव.

प्रत्येकाची नजर वेगळी, दृष्टी वेगळी, दृष्टीकोन वेगळा.

कुणाला तरी याही पेक्षा वेगळं असं काही दिसु शकेल.

बघा प्रयत्न करुन.

----------- - - -- - ----------- --------- ---

तळटीप:

भोळासांब आणि तांडव करणारा शंकर ही याचीच वेगळी स्वरुपे आहेत, पण त्याची चिकित्सा ज्याने त्याने स्वत:च्या जबाबदारीवर करावी.

---- - ------------ -------- ------- ------ ----

बम बम भोले !!!


Comments