मौन

 


मौन

 
सलाम नमस्ते तुझे दुरुन
मौन तुझे उरलय भरुन
गुन्हा काय मी असा केला
खबर दिशांना उरली भरुन.

कोलाहलातुनी सुटका थोडी
सरणावर या एकांत गोडी
न थांबता असे चालायचे
सावल्या कशा जाती सोडुन.

नजर माझी पोचली नाही
मला जरी ती दिसली नाही
धुके धुके धुंद दिशांमधुन
उभी यारी कट्यार घेऊन.

आपले परके कसे कळावे
दंग्यातुनी या कसे मिळावे
हर रस्ता रस्ता गली गली
सारे घेतसे तुला कळुन.



Comments