'ती' ही हत्याच

I Told a Grand Jury I Saw a Cop Shoot and Kill an Unarmed Man. It ...

 

'ती' ही हत्याच

 

जीव एक वा अनेक जाती  आनंद त्यातही कुणी ते घेती,

कुणासाठी खलितेही सजती,  गुळणी धरी मुखी इतरांसाठी,

 

प्राणी असो वा मनुष्यप्राणी  मोल तयाचे न गमते तेव्हा,

अखलाक ठरे बळी झुंडीचा  बंधू मरे म्हणे परिवारा हाती,

 

वृक्ष महतीचे सारे असती  स्वर्गभूमी तसे आरे वसती,

रेल अभिमाने जाय जेथूनी  एका मान, दुजा कलंक माथी,

 

शहीद तेव्हा फासावर चढला  लढण्या खटला नकार दिधला,

आत्मसमर्पण जरी त्या वीरा  रोजही मरे कुणातरी हाती,

 

महात्मा उरी तीन निशाणी  लोहकन्येची झाली चाळणी,

एक लाल का शोधत फिरतो  मरणपुरावे माती दर माती,

 

चांद लावुनी चार संसाराला  रंग भरूनी सावरे पियाला,

मन मारावे का जगायला  पाप त्याचे कुणाच्या माथी?

---

प्रविण धुरी (१०/१०/२०१९)


Comments