आत शिरताच अंगावर
माझ्या सरसरून काटा आला,
एसीच्या गारव्यात
विचारांचा क्षणात एक बोभाटा झाला,
मी शांत पडलो
होतो, शुभ्र सफेद लक्ख चादरीत,
थांबली होती
टिकटिक कधीची, मशीनची एका
लाईनीत.
छोटासा अपघात
होता, डोक्याचा मार किरकोळ होता,
बाहेर एकही जखम
नव्हती, तोच तर मोठा घोळ
होता,
मी तसाच बाहेर
आलो, डोकं धरून बाप
बसलेला,
एकुलतं लेकरू
जातंय बघून, मायेचा तोल
सुटलेला.
कालच तर आणला
होता, असा कसा जाईल तो,
उत्तर काही मिळत
नव्हतं, जिथे कुठे जाईल
तो,
दोन लाखाच बिल
झालं, बापाला तर घामाच
फुटला
काळजाचा तुकडा
गेलाच, सोबत जमिनीचाही
लुटला.
ब्रेनडेड झालाय
म्हणून, त्यांनी एक मार्ग
सांगितला,
अवयव दान करता
येतं, हिशेब शून्यावर
आणून ठेवला,
पुण्ण्याचं काम
म्हणत बापाने आपला होकार भरला,
पोरगं माझं गुणी
किती, गेला तरी तुकडा
उरला.
बिलाचे दोन लाख
अन, वर जमिनीचा दाम
लावला,
पोराने आपली सोय
केली, म्हातारपणाचा
हिशेब जुळला,
बापाचा होकार
येताच, आत सगळी लगबग
झाली,
चार अवयवांच्या
बदल्यात, सहा पेशंटची सोय
झाली.
गरजवंत खूपच होते, हिशेब एकदम साधा
होता,
दोन लाखाचा दाम
वसुलण्या, कष्ट अगदीच आधा
होता,
डोळ्यात आसू अन हसू घेऊन
तसाच मी बाहेर आलो,
पुण्ण्यातून करत
दुःख वजा, बसल्या गर्दीला सामोरा झालो.
सैरभैर नजरेत
प्रश्न घेऊन, तिथेच कोपऱ्यात
ती होती,
आयुष्याचं गणित
घेऊन, शून्याचा अर्थ
शोधत होती,
शेजारी टेकताच
तिच्या, मलादेखील भरून
आलं,
प्रश्नांच्या
आगीत तिच्या, आतून बाहेरून
जाळून गेलं.
त्या एकांती
क्षणाचे, मनस्वी केलेल्या
प्रेमाचे,
केलेल्या
समर्पणाचे, त्या चुकल्या
रजोधर्माचे,
भूतकाळातील
वचनांचे, भविष्यातील
अंधाराचे,
वर्तमानातील
शून्यालाही, शून्यातल्या
आधाराचे.
थंड त्या नजरेतले, हिशेब काही जुळत
नव्हते,
दाम इतका चुकता
केला, हाती काही लागत
नव्हते.
दहा मिनिटांचा
हिशेब माझा, गणितं सारी
चुकवून गेला,
दामदुप्पट
वसूलीने काळ, आयुष्यकोडं
दाखवून गेला.
~
प्रविण धुरी
(१५/१०/२०१९)
(एका दुर्दैवी सत्य घटनेवर आधारीत)
Comments
Post a Comment