Skip to main content
विरह विठूचा
काय माहीत अजून हे सारं
किती दिवस असं चालायचं,
आपण असं ताटकळत सांग
अजून किती दिवस थांबायचं।।
दर्शन त्यांचं नाही गळाभेट नाही
लाडाने आग्रहाचा घास थेट नाही,
भाळी टिळा, टाळ हाती नाही
असं किती दिवस चालायचं |
आपण असं ताटकळत सांग...
डोईवर तुळशीचं वृंदावन घेऊन
म्हातारी पाठीवर, खांद्यावर घेऊन,
कंठी घोष नामाचा एकच ठेऊन
घाटमाथा संगतीन का नाही चालायचं |
आपण असं ताटकळत सांग...
पाणी चंद्रभागेचं आहे तहानलेलं
तीरावरचं वाळवंट ओस पडलेलं,
अभंगाला माहेर कसं आसुसलेलं
कटीवर हात ठेवून किती तिष्ठायचं |
आपण असं ताटकळत सांग
अजून किती दिवस थांबायचं !
-
प्रविण धुरी
Comments
Post a Comment