भारतीयत्वम

भारतीयत्वम

 

कोणतीही जाहिरातसिनेमानाटककथाकविता अशी रचना हा त्या कलाकृतीच्या रचनाकर्त्याचा एक आविष्कार असतो. त्याची निर्मिती होत असताना काही एक विचार त्या निर्मात्याच्या मनात असतो आणि मग त्याची दृश्य स्वरुपात मांडणी सर्वांसमोर येते. तनिष्कची जाहिरात ही सुध्दा अशीच एक उच्च दर्जाची निर्मिती. ती रचणार्‍याने त्यातुन खुप महत्वाचा विचार मांडला आहे. माता बनणे म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच जणु असे म्हटले जाते. त्याच क्षणाचा सोहळा करण्याचीस्त्रीच्या आयुष्यातील हे क्षण आनंदाने साजरा करण्याची ही परंपराआणि ती या जाहिरातीच्या रचनाकर्त्याने छान टिपली आहे. हा या जाहिरातीचा अत्यंत उच्च विचार देणारास्त्रीला मानाचे स्थान देणारा सकारात्मक भाग. पण मग असे काय झाले की या जाहिरातीवरुन इतका वादंग माजावा?

या जाहिरातीमुळे जे नाट्य बघायला मिळालेत्यात अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया होत्यानकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही बाजुकडुन व्यक्त होणार्‍याम्ह्णजे जाहिरातीचे समर्थन करणार्‍या तर दुसरीकडुन कंपनीने जाहिरात मागे घेतली या कृतीचे समर्थन करणार्‍या देखील. या विषयावर येण्यापुर्वी थोडासा जाहिरातसिनेमा अशा कलाकृती आणि त्याचे समाज-जीवनातील स्थान यावर एक दृष्टीक्षेप टाकुया.

कलाकाराला आविष्कार स्वातंत्र्य असावे किंवा असते असं एक सर्वमान्य मत आहे. तसेच एखादी कलाकृती ही त्या त्या काळातील समाजात घडणार्‍या घटनांचा आरसा असते असही म्हटलं जातं. यावर खरंतर परस्पर विरोधी मतप्रवाह आहेतम्हणजे आधी घटना की आधी कलाकृती असा एककोंबडी आणि अंडे स्वरुपाचा वादही अस्तित्वात आहे. काहींच्या मते घडुन गेलेल्या घटना हा एखादी कलाकृती घडवतानाचा मुख्य पाया असतोजसे एखादा उरी सारखा सिनेमा. तर दुसरीकडे एखादा रचनाकार समाजातील वाईट घटना अथवा चुकीच्या प्रथा संपुन जाव्यात या उद्देशाने कलाकृतीची निर्मिती करुन चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या मते तनिष्कची जाहिरात ही दुसर्‍या प्रकारात मोडणारी आहे. अर्थात या जाहिरातीमध्ये मी वर म्हटलेल्या पहिल्या प्रकाराचा अजिबातच संबंध नाही असं माझं म्हणणं नाही. कारण यात ज्या प्रकारे हिंदु-मुस्लिम कुटुंबियांचे संबंध दाखवण्याचा प्रयत्न आहेतशी कुटुंबे प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत. अगदी मध्यमवर्गीयापासुन ते उच्चवर्गीयापर्यंतसिने-कलावंतापासुन ते मंत्र्यापर्यंत. आणि त्यातील बहुतांशी सदस्य आपापले जीवन अगदी सुखात जगत आहेत.

असं असताना या जाहिरातीवर आक्षेप का?

मला वाटतं याला दोन कारणं आहेतएककाही सन्माननीय अपवाद वगळता सामान्यपणे परिस्थिती काहीशी याच्या उलट आहेआणि दोन या कुटुंबांच्या भुमिकेची परस्पर अदलाबदली करुन बघायची झाल्यास चित्र फारसे आशावादी नाही. त्याला कारण आपली कायदेव्यवस्थामुस्लिम समाजाचे मागासलेपण आणि त्यांची काहीशी उग्र स्वरुपाची कट्टरता. आणि हीच गोष्ट जाहिरातीसारखी किंवा सिनेमासारखी एखादी कलाकृती घडवताना आज मारक ठरते आहे. हे सारं नीट समजुन घेण्यासाठी आपण तटस्थपणे थोडंसं मागे जाणं आवश्यक आहे.

स्वातंत्र्यापुर्वीचे दिवस कसे होतेकिंवा काही दशकापुर्वी परिस्थिती कशी होती याचे दाखले आज उपयोगाचे नाहीत. स्वातंत्र्यापुर्वी एकोणिसाव्या शतकात हिंदु मुस्लिम समाज ब्रिटीशांविरुध्द एकत्र लढले होतेही वस्तुस्थिती आहेपण तो इतिहास आहे हेही विसरता नये. कारण असा इतिहास कुणी बघायचा म्हटले तर मागे मागे गेल्यासमग त्याला अंतच उरणार नाहीआणि त्यातुन आरोप-प्रत्यारोपाशिवाय हाती काहीच लागणार नाही. पण १९४७ नंतर ही परिस्थिती काहीशी बदलली हे वास्तव आहे. त्यानंतर समाजामध्ये सकारात्मक बदल होणे अपेक्षित होतेतसे ते काही अंशी झालेहीकारण त्याचंच प्रत्यंतर सत्तरच्या दशकात किंवा त्यानंतरच्या वर्षात दोन धर्मियामध्ये जुळलेल्या काही नातेसंबंधामध्ये दिसुन येते. पण राज्यकर्त्यांच्या काही चुकीच्या धोरणांमुळे म्हणावा तितका बदल झालाच नाहीअसे मात्र आज खेदाने म्हणावे लागते.

यानंतरच्या काळात जाहिरात आणि नाट्य-सिनेमा क्षेत्रात झपाट्याने बदल झाला. अनेक नवनवे विषय नवनव्या पध्दतीने हाताळले जाऊ लागले. आणि याच दरम्यान आविष्कार स्वातंत्र्याचा पुरेपुर उपयोग करत अनेक उत्कृष्ट कलाकृती घडवल्या गेल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जी परिस्थिती निर्माण झाली होतीत्याचा विचार करतात्यावेळी भारतात मागे राहणे निवडलेल्याअल्पसंख्य असलेल्या मुस्लिम समाजाला सुरक्षित वाटण्यासाठी विश्वास निर्माण होणे गरजेचे होते. मला वाटते, याच गोष्टीमुळे त्यावेळी ज्या कलाकृती निर्माण केल्या गेल्यात्यात, त्यावेळच्या बहुसंख्य असणार्‍या हिंदु समाजातील काही घटक हे दुष्प्रवृत्तीच्या स्वरुपात दाखवणे गरजेचे होते. आणि त्यातुन मुस्लिम समाजाला आवश्यक सुरक्षितताअथवा त्यांचे तारणहार म्हणुन नायकांचे असणेअथवा त्यातुनच एखादा नवा नायक निर्माण होणे हे गरजेचे होते. मी वर म्हटलेल्या दोन प्रकारातील संगम असणार्‍या या कलाकृतीज्यात त्या त्यावेळच्या रचनाकाराने आविष्कार स्वातंत्र्य घेऊन भविष्यात समाजात अपेक्षित बदल कसे असावेत हे दाखवण्याचा केलेला हा प्रयत्न होता.

पण नंतर मात्र व्यावसायिक यशापयशाची गणिते करताना हीच एक पध्दत रुढ होवुन गेलीसर्वमान्य झाली. आणि त्यातुनच भ्रष्ट अधिकारीराजकारणीपोलिस अधिकारीपुजारी अशी काही पात्रे कोणत्या जातीधर्माची आणि कशा चारित्र्याची असावीत हे नक्की होत गेले. त्याचवेळी दुसरीकडे परिस्थितीमुळे गुंड बनलेली पण सुधारणारी माणसेकाही धार्मिक पण चांगल्या चारित्र्याची माणसे ही कोणत्या जातीधर्माची असावीत याचीही वर्गवारी ठरुन गेली. कदाचित सुरुवातीच्या काळातील रचनाकर्त्याना समाजाचे वास्तव आणि अपेक्षित बदल याचा संगम त्यात दाखवायचा असावा ज्याचा नंतरच्या निर्मात्याना विसर पडला. आणि याचेच प्रतिबिंब अनेक सिनेमाजाहिरात अशा कलाकृतीमधुन दिसु लागले. याचा परिणाम पुढे पुढे इतक्या थराला गेला की डरबाजीगरवन्स अपॉन अ टाईमरईस यासारख्या नकारात्मक प्रवृत्तींचे उदात्तीकरण करणार्‍या कलाकृतींचा जन्म झाला आणि त्या सर्व कलाकृती तितक्याच सहजपणे समाजाकडुन स्विकारल्या गेल्या. काही काळानंतर जागतिक पटलावर दहशतवादाचा प्रवेश झाला तसा तो चित्रपटाच्या पडद्यावरही झाला. पाश्चिमात्य अथवा हॉलीवुडमधील कलाकृतीनी या नव्या पात्राचे स्वागत करतानात्याला जागा देताना काही अंशी वास्तवाचे भान ठेवुन निर्मिती केली. पण भारतीयत्यातही हिंदी चित्रपट सृष्टीने मात्र वेगळा मार्ग निवडला असे म्हणायला जागा आहे. सिंघम सारखा चित्रपट अथवा काही गाजलेल्या वेबसीरीजवर एक नजर टाकली तर माझे हे मत पटू शकेल.

आविष्कार स्वातंत्र्याचा ढोल पिटत निर्माण होणार्‍या कलाकृतीनीया दरम्यानच्या काळात समाजात घडलेल्या काही बदलांकडे मात्र कानाडोळा केला असावा असा संशय घ्यायला मात्र जागा उरली. स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांमध्ये भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढलीतशी ती मुस्लिम समाजाची देखील वाढली. या दरम्यान इतर समाज प्रगती करत असतानाविज्ञानाची कास धरुन पुढे जात असतानाकाही सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य मुस्लिम समाज मात्र धार्मिक भावनेतुनच अधिकाधिक कट्टर बनत गेलात्या तुलनेत इतर धर्मीय समाजांचा मागासलेपणा कमी होत जाऊन प्रगती झालेली दिसुन आलीपण या गोष्टीवर आपल्या कलाकृतीमधुन फारसे भाष्य न करताअनेक रचनाकारानी मात्र धार्मिक बाबींचा आधार घेत मुस्लिम समाजाचे पुढारलेपण दाखवण्यातच धन्यता मानली. सिनेमासारखे प्रभावी माध्यमजाहिरात अशा कलाकृतींचा समाजमनावर परिणाम होतो अथवा त्या समाजाच्या आरसा असतात असं म्हणायचं झालंतर कदाचित त्याचाच परिणाम म्हणुन मुस्लिम समाजात धार्मिक बाबीनाच अधिक महत्व आले असे म्हणावे लागेल. ज्यातुन तो समाज अधिकाधिक धार्मिक कट्टरतेकडे झुकला असेही म्हणायला मग वाव उरतो.

इतक्या वर्षांच्या कालावधीनंतर हिंदु समाजामध्ये अनेक बदल झाले आहेत. अनेक वाईट चाली-रितीना तिलांजली देण्यात समाजाला बर्‍याच अंशी यश आलं आहे. सण उत्सव साजरे करण्यात सजगता आली आहेनिसर्गाबद्दल कृतज्ञतेची भावना वाढीस लागली आहे. अनेक जाहिरातीमधुन या गोष्टींचा देखील खुबीने वापर करुन घेतला जातो. पण हिंदु-मुस्लिम संबंध दाखवताना मात्र आजही सणांचा वापर करत एका घटकाला नेहमीच असहिष्णु दाखवण्यात नक्की काय साध्य करण्याचा प्रयत्न केला जातोय याचं उत्तर सापडत नाही. याच गोष्टींचा वापर आज अनेक नेतेमंडळी राजकारणात आपली पोळी भाजुन घेण्यासाठीदेखील करताना आढळतात. मुस्लिम समाजासाठी शिक्षणआरोग्य किंवा उपलब्ध सरकारी योजना यांविषयी भाष्य करण्याचे टाळून बरेचदा फक्त धार्मिक बाबींवरच भाष्य करण्यात येते. त्याचेच दर्शन समाजमाध्यमावरुन घडते. परिणामी हा समाज इतर गोष्टीविषयी त्यातुन मिळणार्‍या लाभाविषयी अनभिज्ञ राहतो. आणि धर्म या गोष्टीवरुन एखादी छोटीशी चिंगारी मिळताच पेटुन उठतोत्यात आपली उर्जा वाया घालवतोआणि प्रगतीच्या वाटेपासुन अधिकच भरकटत जातो.  

आणि हे फक्त इतक्यापुरतच मर्यादित नाहीबरं का ! मागील दोन तीन दशकातील राजकीय घडामोडीवर दृष्टीक्षेप टाकला तर सहज लक्षात येते की मराठी अस्मितेवरुन अथवा एखाद्या जातीवरुन राजकारण करणारे देखील हेच करत असताततात्कालिक वैयक्तिक फायदा ऊठवण्यापलिकडे तरी त्यातुन समाजासाठी काही साध्य होताना दिसत नाही.

एका बाजुला हे सारं मुस्लिम समाजाविषयी बोलत असताना हिंदु समाज या सगळ्यातुन सुटला असं म्हणणं धारिष्ट्याचं होईल. कारण या सर्व घटनांचा काही ना काही परिणाम हिंदु समाजाच्या मानसिकतेवर नक्कीच होत होता. संख्येने जास्त असणार्‍या हिंदु समाजात होणारे हे बदल कदाचित सहजासहजी लक्षात येत नव्हतेपण इतक्या वर्षांच्या कालावधीत हळूहळू का होईनायाच समाजातील काही लोक मात्र तितकेच कट्टर धार्मिक बनत होते हा सुध्दा या सर्व घटनांचाच परिणाम आहे. बहुतांशी लोक जरी विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या आधारे प्रगतीची वाटचाल करत असलेतरीही काही प्रमाणात का होईना धर्म या संकल्पनेला चिकटुन असणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच राहिले.

त्याच तंत्रज्ञानाच्या आधारे निर्माण झालेल्या व्यासपीठावरुन तनिष्कच्या जाहिरातीवर ट्रोलच्या माध्यमातुन आज सर्वात जास्त टीका झालीआणि त्या जाहिरातीचे समर्थन करणारे देखील त्याच पंथाचे वाटसरु असावेत हा योगायोग असावा काजाहिरातीला विरोध करणार्‍याना 'तनिष्कचे दागिने खरेदी करण्याची ताकद आहे काहे सुध्दा विचारण्यात आले. प्रकरण इतकं वाढलं की शेअर मार्केटमध्ये या कंपनीचा भाव काही टक्क्यानी कोसळला आणि शेवटी ही जाहिरात कंपनीने मागे घेतली.

यातुन काही प्रश्न उभे राहतात?

- तनिष्कचे उत्पादन खरेदी करण्याची ताकद ही फक्त सतत टीवटीव करणार्‍या जनतेकडेच आहे काआणि जर ती तशी आहे तर सामान्य जनतेच्या मतांचा कुणी खरंच कधी विचार करतं का?

- एका छोट्याशा २०-२२ सेकंदाच्या जाहिरातीमध्ये समाजात सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडवण्याची ताकद असते काजर ती असते तर यापुर्वी येऊन गेलेल्या किती जाहिरातीनी अथवा चित्रपटानी तसे परिवर्तन घडवले आहे?

- जाहिरात प्रसारित करणे अथवा ती मागे घेणे यामध्ये समाजभावना दुखावणेज्या या प्रकरणात टीवटीव माध्यमापुरत्याच मर्यादित होत्यायापेक्षाही त्या उत्पादनाच्या निर्मात्यांसाठी व्यावसायिक गणिते अधिक महत्वाची नसतात का?

मला वाटतंउलट ही गणिते महत्वाची होती म्हणुन कंपनीने आपले संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ही जाहिरात मागे घेण्याची शक्यताच अधिक आहे. टीवटीव करणार्‍या जनतेला नसला तरी कंपनीला तेवढा जमाखर्च नक्कीच कळत असणार.  

तसेच अगदीच नाही असेही म्हणता येणार नाहीपण जाहिरातीच्या माध्यमातुन सकारात्मक बदल घडण्याची उदाहरणे मात्र निश्चितच कमी प्रमाणात सापडतील.

वैयक्तिक पातळीवर माझा ना जाहिरातीला विरोध आहे ना समर्थन आहे. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ही जाहिरात एक कलाकृती म्हणुन उत्कृष्ट आहे. त्यातुन स्त्रीचातिच्या मातृत्वाचा अभिप्रेत असणारा सन्मान हा कोणत्याही जाती-धर्माच्या पलीकडचा आहे. फक्त या किंवा अशा कलाकृतीच्या रचैत्यानी यापुढे आपले आविष्कार स्वातंत्र्य अधिक सजगपणे वापरावे आणि दोन्ही धर्मातील सकारात्मक बाजु दाखवणार्‍या उत्तमोत्तम कलाकृती घडवाव्यात हीच त्यांच्याकडुन अपेक्षा.

तसेच दुसरीकडे समाजातील विचारवंत म्हणवणार्‍या आणि उठसुट चार ओळीत आपल्या भावना व्यक्त करुनतोच समाजमनाचा खरा आरसा असल्याच्या थाटात वावरणार्‍याकाहीशेच्या संख्येत असणार्‍या महनीय व्यक्तीनीभ्रमाच्या कोषातुन बाहेर येऊन जरा अधिक सजगपणे योग्य प्रश्नांवर भाष्य करावे.

रचनाकारांच्या उत्तम कलाकृती आणि त्यावरील समर्पक व योग्य भाष्य या दोन्हीच्या संगमातुन समाजाच्या मानसिकतेवर चांगला परिणाम होवुनसमृध्द परंपरांचा वारसा लाभलेला आपला भारत भविष्यात अधिक समृध्द होईल आणि जातीधर्माच्या या पोकळतकलादु भिंती नाहीशा होवुन त्यातुन एकसंध भारतीय समाज निर्माण होईलहीच सदिच्छा !!

© प्रविण धुरी (१८/१०/२०२०)



image - http://www.udayindiahindi.in/
image - https://www.tanishq.co.in/ekatvam

Comments

  1. अगदी छान समतोल ठेऊन लिहिलं आहे!

    ReplyDelete
  2. छान मांडले आहे.

    ReplyDelete

Post a Comment